Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त

पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त

=कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा फायदा=
petrol_rupeeनवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने त्याचा फायदा पुन्हा एकदा देशवासीयांना मिळाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या प्रतिलिटर किमतीत २.४२ रुपयांची आणि डिझेलच्या प्रतिलिटर किमतीत २.२५ रुपयांची कपात जाहीर केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात अंमलात येणार आहे.
गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून पेट्रोलच्या किमतीत करण्यात आलेली ही सलग दहावी कपात ठरली असून, ऑक्टोबरपासून डिझेलच्या किमतीत झालेली ही सहावी कपात आहे. या दरकपातीत प्रत्येक शहरांमधील स्थानिक कर किंवा व्हॅटचा समावेश करण्यात आला नसल्याने, प्रत्यक्षात होणारी दरकपात यापेक्षाही जास्त राहणार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
सप्टेंबर २०१० पासून पेट्रोलची किंमत आता सर्वात कमी झाली आहे. तर, मार्च २०१३ नंतर प्रथमच डिझेलच्या किमती इतक्या कमी स्तरावर आलेल्या आहेत. डिझेलमधील कपातीमुळे मालवाहतूक आणखी स्वस्त होणार असून, याचा परिणाम महागाईचा दर आणखी कमी होण्यात होणार आहे. अवघ्या १५ ते २० दिवसांतील ही दुसरी मोठी दरकपात आहे. मकरसंक्रांतीच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे १६ जानेवारीला दोन्ही इंधनांच्या किमतीत कपात जाहीर करण्यात आली होती. असे असले, तरी एटीएफ म्हणजेच विमानाला लागणार्‍या इंधनाच्या किमतीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20313

Posted by on Feb 4 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2119 of 2453 articles)


=नरेंद्र मोदी यांचा ‘आप’वर घणाघाती हल्ला= नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] - आम आदमी पार्टीवर बनावट कंपन्यांकडून देणग्या स्वीकारल्याचा आरोप होत ...

×