Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल वाहनांवरील बंदीचा फेरविचार करा

पेट्रोल, डिझेल वाहनांवरील बंदीचा फेरविचार करा

=केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात जाणार=
nitin gadkari1नवी दिल्ली, [२ मे] – पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात करणार आहे.
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनावर बंदी घातल्यानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन भवनात आज सोमवारी तातडीची बैठक बोलावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या हजारो चालकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, तसेच वाहतुकीचा गंभीर प्रश्‍नही निर्माण झाला आहे. त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत.
‘भारत स्टेज ६’ ची अंमलबजावणी १ एप्रिल २०२० पासून करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, त्याचप्रमाणे या प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यक असलेल्या इंधनाची निर्मिती करण्यासाठी तेल कंपन्यांनी ६० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी केली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, असे सांगत न्यायालयाने या वाहनांवर बंदी घातली आहे. याचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, राजधानी दिल्लीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आयुष्य संपलेली वाहने निकालात काढण्याचे धोरण सरकारने तयार केले आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी ८ पदरी रस्ते तयार करण्याचाही निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावर ई टोलिंग सुरू करण्यात आले आहे. ई रिक्षासंदर्भात धोरण आखले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28130

Posted by on May 3 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (394 of 2453 articles)


=हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळा= नवी दिल्ली, [२ मे] - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप असलेले माजी हवाई दलप्रमुख ...

×