Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल स्वस्त, डिझेल महागले

पेट्रोल स्वस्त, डिझेल महागले

petrol-diesel pumpनवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – केंद्रीय अर्थसंकल्पातून ग्रामीण आणि गरिबांच्या विकासावर भर देण्यात आल्यानंतर, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना ‘थोडा आनंद… थोडे दु:ख’ असा अनुभवही दिला. पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत ३.०२ रुपयांची मोठी कपात करतानाच, डिझेलच्या प्रति लिटर किमतीत मात्र १.४७ रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली. आज सोमवारी मध्यरात्रीपासूनच पेट्रोल व डिझेलचे हे नवे दर अंमलात येणार आहेत.
पेट्रोलमधील दरकपात सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरली असली, तरी डिझेलच्या दरवाढीमुळे काही प्रमाणात का होईना महागाईला चालना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अलीकडील काळात किंचित वाढ झाली असली, तरी ती फार जास्त नसल्याने, त्याचा फायदा देशवासीयांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या दरकपात किंवा दरवाढीत स्थानिक विक्रीकराचा समावेश नसल्याने, ही दरकपात आणि दरवाढ यापेक्षाही जास्त राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26960

Posted by on Feb 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (792 of 2453 articles)


कॅलिफोर्निया, [२९ फेब्रुवारी] - कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये हॉलीवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘८८वा ऑस्कर पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. या ...

×