Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल ६३ पैसे, डिझेल १०६ रुपयाने स्वस्त

पेट्रोल ६३ पैसे, डिझेल १०६ रुपयाने स्वस्त

petrol-diesel pumpनवी दिल्ली, [३१ डिसेंबर] – संपूर्ण देश नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला असतानाच केंद्राने पूर्वसंध्येला पेट्रोल ६३ पैसे आणि डिझेल १.०६ रुपयांनी स्वस्त करून सामान्यांना नववर्षाची भेट दिली. ही दरकपात गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराचा सध्याचा स्तर आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी ही टरकपात करण्यात आली आहे, असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या सर्वांत मोठ्या सरकारी तेल कंपनीकडून सांगण्यात आले. या दरकपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ५९.३५ रुपये आणि डिझेल ४५.०३ रुपये प्रतिलिटर असा झाला आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी १५ डिसेंबरला आढावा घेतल्यानंतर पेट्रोल ५० पैसे आणि डिझेल ४६ पैशांनी स्वस्त केले होते. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात होणार्‍या चढउताराप्रमाणे हे दर निश्‍चित होतात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26352

Posted by on Jan 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (959 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१ जानेवारी] - संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेला दिल्लीतील रस्त्यावर सम -विषम तारखेनुसार चारचाकी गाड्‌या चालविण्याचा निर्णय आजपासून ...

×