Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, १६ ठार

पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, १६ ठार

=सरकारी कर्मचार्‍यांचा समावेश, २५ जखमी=
pak Peshawar_Mapपेशावर, [१६ मार्च] – पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील पेशावर शहरात आज बुधवारी सकाळी एका बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात १६ जण ठार, तर अन्य २५ जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारली नसली, तरी यामागे तालिबानचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पेशावरच्या सुनेहरी मशिदीजवळून ही बस नागरी सचिवालयातील कर्मचार्‍यांना घेऊन पेशावरकडे जात असताना हा स्फोट झाला. या बसमध्येच अतिरेक्यांनी शक्तिशाली बॉम्ब पेरून ठेवला होता आणि बॉम्बमध्ये आठ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलिस अधीक्षक मोहम्मद कासिफ यांनी वृत्तसंस्थेला दिली.
या बसमधून सुमारे ५० कर्मचारी कार्यालयाकडे जात होते. या स्फोटात २५ जण जखमी झाले असून, त्यांना विविध रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27372

Posted by on Mar 17 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (643 of 2458 articles)


नवी दिल्ली, [१६ मार्च] - तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांवर एका स्टिंग ऑपरेशनद्वारे पैसे घेण्याच्या लागलेल्या आरोपांचे प्रकरण आज लोकसभेच्या सभापती सुमित्रा ...

×