Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पोटगी नाकारणे हा आर्थिक अत्याचार

पोटगी नाकारणे हा आर्थिक अत्याचार

=न्यायालयाचा निर्वाळा=
LAWनवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] – कोणतेही आर्थिक उत्पन्न नसणार्‍या पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी नाकारणे, हा आर्थिक अत्याचारच असल्याचा निर्वाळा दिल्लीतील सत्र न्यायालयाने दिला आहे. सुनावणी न्यायालयाकडून खारिज करण्यात आलेल्या एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले.
या प्रकरणात आपला खर्च भागविण्यासाठी घटस्फोटीत महिलेकडे उत्पन्नाचा कोणताही मार्ग नसल्याचे पुरेसे पुरावे आहेत. शिवाय, तिच्या पतीचे उत्पन्न चांगले असून, तो आरामशीर समृद्ध जीवन जगतो आहे. अशावेळी त्यानेच आपल्या पत्नीचा खर्च उचलायला हवा आणि असे करण्यास तो नकार देऊ शकत नाही. त्याने नकार दिल्यास हा पत्नीवरील आर्थिक अत्याचार समजला जाईल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलत्स्य प्रेमचल यांनी आपल्या निर्णयात स्पष्ट केले. तसेच, या कृतीला कौटुंबिक हिंसाचार म्हणता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३५ वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या या दाम्पत्याला ३ अपत्ये असून विभक्त झाल्यानंतरही ते एकाच घरात पण वेगळ्या मजल्यांवर राहतात, याचाही न्यायालयाने उल्लेख केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20424

Posted by on Feb 9 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2091 of 2453 articles)


=कैलास सत्यार्थी यांचे मत= लंडन, [८ फेब्रुवारी] - बाल कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी बाल कामगार विधेयक संसदेत पारित करण्याचे सर्वात मोठे ...

×