Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पोलिस कल्याण निधीसाठी ट्रस्ट : राम शिंदे

पोलिस कल्याण निधीसाठी ट्रस्ट : राम शिंदे

Maharashtra Minister of State for Home Ram Shindeमुंबई, [१६ मार्च] – पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्यासाठी पोलिस कल्याण निधी प्राधान्याने वापरला जावा, यासाठी राज्य सरकार पोलिस कल्याण निधीचा एक न्यास स्थापन करण्याचा विचार करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
पोलिस कल्याण निधी कायद्याच्या बदलांसंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ऍड. निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर, सतेज पाटील यांनी पोलिस कल्याण निधीचा ट्रस्ट करण्यात येणार आहे का, यादृष्टीने सरकार काही धोरणात्मक निर्णय घेणार आहे का, असा उपप्रश्‍न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, पोलिस कल्याण निधीचा ट्रस्ट करण्याबाबतची सूचना स्वागतार्ह असून, त्यासंबंधी नक्की विचार करण्यात येईल.
पोलिस कल्याण निधीचे वार्षिक अंदाजपत्रक पुरेसे नाही. या अंदाजपत्रकात वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील पोलिसांकडून अनेक वर्षापासून करण्यात येत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. पोलिस कल्याण निधी हा पोलिस अधिकार्‍यांकडून वार्षिक वर्गणीच्या माध्यमातून गोळा करण्यात येतो. क आणि ड वर्गातील कर्मचारी हे ऐच्छिक सभासद असतात. त्याचप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पातून ५० लाख रुपये यासाठी देण्यात येतात. पोलिस कर्मचार्‍यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी पोलिस महासंचालकांकडून सदर निधीचा वाटप त्या त्या यूनिटकडे करण्यात येतो, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी यावेळी दिली.
२०१२-१३ या वित्तीय वर्षात १ हजार ६६६ वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. २०१४-१५ मध्ये ७९६ तर यंदा ३४० वाहने खरेदी करून त्याचे वाटपही करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27384

Posted by on Mar 17 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (635 of 2451 articles)


=सुप्रिया सुळे यांची भूमिका= नवी दिल्ली, [१६ मार्च] - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र ...

×