Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पोस्टाच्या तिकिटावरून गांधी घराणे हद्दपार!

पोस्टाच्या तिकिटावरून गांधी घराणे हद्दपार!

gandhi stampनवी दिल्ली, [१५ सप्टेंबर] – इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची टपाल तिकिटे आता लवकरच हद्दपार होणार आहेत. कॉंग्रेस सरकारने सुरू केलेली तिकिटांची मालिका डबाबंद करून त्यांच्याजागी दीनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी व राम मनोहर लोहिया यांची टपाल तिकिटे जारी करणार आहेत.
२००८ मध्ये कॉंग्रेसप्रणित युपीए सरकारने इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे फोटो असलेली दोन तिकिटं ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ या शिर्षकाखाली पोस्टाने सुरू केले होते. त्यात जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, होमी भाभा, जेआरडी टाटा व मदर तेरेसा यांचा समावेश होता. त्यानंतर मे २००९ मध्ये यात आणखी तीन मान्यवरांच्या तिकिटांची भर पडली. मात्र आता यातील इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पाच रूपयांची तिकिटं बंद होतील. अशी माहिती समोर आली आहे.
पोस्ट विभाग आता २४ नवीन तिकिटांची मालिका सुरू करणार आहे. ‘भारताचे निर्माते’ या शिर्षकाने ही मालिका असेल आणि यात योगावरही एक तिकीट असणार आहे. तसेच सरदार वल्लभ भाई पटेल, बाळ गंगाधर टिळक, सुभाष चंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, भगत सिंग, रविंद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, सुब्रमण्यम भारती, पंडित रवी शंकर, भिमसेन जोशी, एम.एस. सुब्बालक्ष्मी आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे छायाचित्रे असलेली ही नवी तिकिटं लवकरच सरकार छापणार आहे.
दरम्यान, इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार आणि राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान – विज्ञान मौलिक पुस्तक लेखन पुरस्कार यांची नावं बदलून सरकारने ‘राजभाषा किर्ती पुरस्कार आणि राजभाषा गौरव पुरस्कार’ अशी केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23810

Posted by on Sep 15 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1471 of 2453 articles)


=आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन= न्यूयॉर्क, [१४ सप्टेंबर] - आधुनिक व प्रगत मानवी मूल्यांवर आधारित जगाची मुहूर्तमेढ रोवण्यात सर्वांना सोबत घेऊन ...

×