Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » प्रचंड गोंधळात विमा विधेयक सादर

प्रचंड गोंधळात विमा विधेयक सादर

sansad4नवी दिल्ली, [३ मार्च] – डावे पक्ष आणि तृणमूल कॉंगे्रसच्या प्रचंड विरोधात सरकारने मंगळवार, ३ मार्च रोजी विमा दुरुस्ती विदेयक लोकसभेत सादर केले. आर्थिक सुधारणांना प्रचंड गती देणार्‍या या विधेयकामुळे विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के इतकी होणार आहे.
मागील अधिवेशनात हे विधेयक पारित न झाल्याने सरकारने यावर अध्यादेश जारी केला होता. आता या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेणार आहे. विमा कायदा १९३८, जनरल इन्शुरन्स बिझनेस कायदा १९७२ आणि विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा १९९९ मध्ये दुरुस्ती करण्याची तरतूद यात आहे.
सध्या विमा क्षेत्रात २६ टक्क्यांपर्यंत विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. हे विधेयक पारित झाल्यास थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे विधेयक अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मत विभाजनानंतर सादर केले. डावे पक्ष आणि तृणमूल कॉंगे्रसने विधेयकाचा प्रखर विरोध केला. विधेयकाच्या बाजूने १३१ आणि विरोधात ४५ मते पडली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21063

Posted by on Mar 4 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1986 of 2453 articles)


अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित अंमलबजावणीवर लवकरच निर्णय मुंबई, [२ मार्च] - महाराष्ट्रात गोवंश हत्येवर कायमची बंदी घालण्याची ...

×