Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » प्रजासत्ताकदिनाच्या धर्तीवर योगदिनाचे थेट प्रसारण

प्रजासत्ताकदिनाच्या धर्तीवर योगदिनाचे थेट प्रसारण

=दूरदर्शनचा निर्णय=
doordarshan logoनवी दिल्ली, [१४ जून] – येत्या २१ जून रोजी साजर्‍या होणार्‍या पहिल्याच आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमाचे प्रजासत्ताकदिनाच्या धर्तीवर थेट प्रसारण करण्याचा निर्णय दूरदर्शनने घेतला आहे.
राजधानी दिल्लीच्या राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतराष्ट्रीय योगदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यासाठी दूरदर्शनने २० पेक्षा जास्त अत्याधुनिक कॅमेरे लावण्याची व्यवस्था केली आहे. इंडिया गेटवरही दोन कॅमेरे लावण्यात येणार आहेत. बाहेरील भागातही कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी व्हॅनची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येत लोक या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून योगासनेही करणार आहेत.
अत्यंत अनुभवी तंत्रज्ञ, सिनेमेटोग्राफर आणि महत्त्वाच्या व्यक्तींची दूरदर्शनकडून याकामी मदत घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असून, आंतरराष्ट्रीय योगदिनाचे प्रसारण अभिमानाची बाब असल्याचे प्रसारभारती अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22925

Posted by on Jun 16 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1617 of 2453 articles)


न्यूयॉर्क, [१४ जून] - अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणूक शर्यतीत उतरलेल्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिटंन यांनी शनिवारी आपल्या निवडणूक अभियानास सुरुवात ...

×