Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » प्रत्यक्ष नियंत्रण रेषा निश्‍चित करायला हवी

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा निश्‍चित करायला हवी

=पर्रीकर यांची चीनला सूचना=
parrikar_manohar3बीजिंग, [१८ एप्रिल] – प्रत्यक्ष नियंत्रण रेषा दोन्ही देशांना मान्य होईल, अशा पद्धतीने निश्‍चित करायला हवी. सीमेवर वारंवार होणार्‍या घुसखोरीवर कायमचा आळा घालण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे, अशी स्पष्ट भूमिका संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सोमवारी येथे विशद केली. विशेष म्हणजे, बीजिंगने आतापर्यंत या प्रस्तावाला विरोधच केला आहे.
मनोहर पर्रीकर यांनी चीनचे संरक्षण मंत्री चांग वॉंकून यांची पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मुख्यालयात भेट घेतली. पाकधार्जिण्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मौलाना मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खीळ घालण्याच्या चीनच्या भूमिकेवर पर्रीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भारत आणि चीनमधील संबंध सुधारावे, यावरच आम्ही सातत्याने भर दिला आहे. आमच्यासाठी चीनसोबतची मैत्री महत्त्वाची आहे आणि या मैत्रीला आम्ही प्राधान्य दिले आहे, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पर्रीकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. रविवारी शांघायहून बीजिंगमध्ये दाखल झाल्यानंतर पर्रीकर यांनी आज चिनी लष्कराच्या येथील मुख्यालयाला भेट दिली. यावेळी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पर्रीकर यांचे भव्य स्वागत केले. यावेळी चांग वॉंकून यांनीही पर्रीकर यांच्याशी हस्तांदोलन करताना, तुमची पहिलीच चीन भेट आमच्यासाठी विशेष महत्त्वाची असल्याचे जाहीर केले. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील विश्‍वास यामुळे आणखी वृद्धींगत होईल, असा आम्हाला विश्‍वास आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27884

Posted by on Apr 19 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (474 of 2458 articles)


लखनौ, [१८ एप्रिल] - जगप्रसिद्ध ताजमहाल असलेल्या आगरा येथे सत्तारूढ समाजवादी पक्षाला सोमवारी जोरदार धक्का बसला असून, पक्षाच्या एका घोषित ...

×