Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचणार

प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचणार

=अमित शाह यांचा विश्‍वास=
Amit_Shah_Haryana_rallyलखनौ, [५ मार्च] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआचे सरकार प्रत्येक गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकासाचे गंगा पोचवेल, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
मथुरेच्या वृंदावन येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्‌घाटन केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
गावाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व्यक्तीपर्यंत विकास पोचण्याची गरज आहे आणि प्रत्येक गावाच्या कानाकोपर्‍यात विकास नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विकासाची कामे नेमकी कुठे करायची, याची पंतप्रधान मोदींना कल्पना आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोचेल, असेही अमित शाह म्हणाले.
पंतप्रधान पीकविमा योजनेमुळे समृद्धीचा मार्ग प्रशस्त झाला आहे, विकासाच्या बाबतीत भारत आता अग्रेसर आहे, देशातील युवकांसाठी काय करायचे हेदेखील पक्षाने निश्‍चित केले आहे, असे सांगतानाच, म्हणूनच आज भाजपा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे, असे अमित शाह म्हणाले. मोदी सरकारने सर्वात आधी देशाच्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. आता आमच्या सैनिकांचा शिरच्छेद करून शिर नेण्याची कोणाची हिंमत नाही, असेही ते म्हणाले.
युवापिढी ही परिवर्तनाची वाहक आहे. केवळ केंद्रात बहुमताने सरकार स्थापन झाले म्हणजे आपले काम संपले, असा समज भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी करू नये. भारताला विश्‍वगुरू बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढील २५ वर्षे आपले सरकार आवश्यक आहे आणि कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्न करावे. सरकारच्या योजना घराघरात पोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे, असेही ते म्हणाले. भाजपा हा एक वेगळा पक्ष असून, या पक्षाच्या स्थापनेमागे एक विचार आहे, राजकीय हेतू नव्हे. कार्यकर्त्यांनीही हीच विचारधारा पुढे न्यायची आहे. भाजपाची सरकारे कोणत्याही व्यक्तीसाठी बनत नाहीत. मोदी सरकार लोकांच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. आधीच्या काळात दहा वर्षे पंतप्रधान मौन होते. प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता. पंतप्रधानांना कोणीही तसे मानत नव्हते. डॉ. मनमोहनसिंग लिहिलेले भाषण वाचत, कधीकधी पानही बदलले जात असे. परंतु, मोदींनी युनोमध्ये हिंदीत भाषण केले, मोदींनी गंगाकिनार्‍यावर जाऊन आरती केली. त्यामुळे नेतृत्व कसे असावे हे आम्हाला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही, असा टोला शाह यांनी लगावला. कॉंग्रेसच्या निराशाजनक राजवटीमुळे निराश, हताश युवकांनी भाजपा आणि मोदींवर विश्‍वास व्यक्त केला. दोन वर्षात देशात चमत्कारिक परिवर्तन झाले, असा दावाही शाह यांनी केला. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही यावेळी आपले विचार मांडले.
हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात झालेल्या राष्ट्रविरोधी घोषणाबाजीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलामा देऊन पाठराखण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना बोलू द्या, असे सांगितले. राष्ट्रविरोधी घोषणबाजीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुळीच म्हणता येणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला खरे तर लाज वाटली पाहिजे. तुम्ही कोणासोबत आहात, हे कॉंग्रेसने स्पष्ट केले पाहिजे, असे सांगून अमित शाह यांनी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरपूस समाचार घेतला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27037

Posted by on Mar 6 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (760 of 2452 articles)


=रबर स्टॅम्प म्हणून वापरल्याचा आरोप= नवी दिल्ली, [५ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात ९ फेब्रुवारी रोजी झालेली घटना ...

×