Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम

प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम

=सुप्रीम कोर्ट करणार सुनावणी=
supreme-court_6नवी दिल्ली, [८ एप्रिल] – ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन करण्याच्या मुद्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करण्याचे मान्य केले आहे.
यासाठी न्यायालयाने समाजातील दुर्लक्षित व वृद्ध लोकांना नि:शुल्क कायदेविषयक सेवा उपलब्ध करून देणार्‍या हेल्पएज इंडिया आणि नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऍथॉरिटीला सहकार्य करण्यास सांगितले आहे. कॉंगे्रसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्‍वनी कुमार यांनी याबाबतची याचिका दाखल केली असून, वृद्धाश्रमांकरिता अर्थसंकल्पात आवश्यक ती वाढ करण्याची विनंतीही केली आहे.
ही याचिका दाखल करून घेताना सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने सामाजिक न्याय मंत्रालयाला नोटीस जारी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27761

Posted by on Apr 9 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (508 of 2453 articles)


=मेळघाटातील हरिसाल गावाला मिळणार पहिला मान= मुंबई, [७ एप्रिल] - राज्यातील दहा शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणार आहोतच पण ...

×