Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » प्रत्येक नेपाळी बांधवाचे अश्रू पुसणार

प्रत्येक नेपाळी बांधवाचे अश्रू पुसणार

=‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची ग्वाही=
narendra_modi11नवी दिल्ली, [२६ एप्रिल] – नेपाळवर ओढवलेले नैसर्गिक संकट अतिशय भीषण असेच आहे. या कठीण प्रसंगी भारत खंबीरपणे नेपाळच्या पाठीशी आहे. प्रत्येक नेपाळी नागरिकाचे अश्रू आम्ही पुसणार आहोत. नेपाळमधील आमच्या बंधू-भगिणींचे दु:ख आम्ही समजू शकतो. या धक्क्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही आपल्या प्रयत्नात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दिली.
२६ एप्रिल रोजी पंतप्रधान ‘मन की बात’मधून ज्येष्ठांबद्दल देशवासीयांना संबोधित करणार होते. मात्र, शनिवार आणि रविवारी नेपाळसह भारतालाही महाविनाशकारी भूकंपाचे हादरे बसले. त्यामुळे त्यांनी भूकंपाचा विषय निवडला.
नेपाळमधील भूकंपाची भीषणता फार मोठी आहे. अनेक इमारतींचा ढिगारा झाला आहे. त्याखाली दबलेल्या असंख्य नागरिकांना वाचविण्यासाठी भारताने मदत व बचाव पथकांसह श्‍वान पथकेही पाठविली आहेत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भूकंपात झालेला महाविनाश मी आपल्या डोळ्यांनी बघितला असल्याने आज नेपाळवासीयांवर काय प्रसंग ओढवला असेल, याची जाणीव मला आहे. माझ्या नेपाळी बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण भारत देश अर्थात सव्वाशे कोटी भारतीय या कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. तुमचा हात हातात घेऊन तुम्हाला पुन्हा उभे करू. जास्तीत जास्त लोकांना वाचविणे, हाच आपला उद्देश आहे, असे मोदी यांनी या कार्यक्रमात सांगितले.
युद्धाने ग्रासलेल्या येमेनमधून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्याचे कठीण काम आम्ही केले आहे. एक आठड्याच्या मुलीलाही आम्ही सुखरूप भारतात आणले. येमेनमधून ४८ देशांच्या नागरिकांचीही आम्ही सुटका केली. यामुळे जगभरात भारताच्या मदतीचे कौतुक होत आहे. अलीकडेच फ्रान्स दौर्‍याच्या काळात पहिल्या महायुद्धाच्या ठिकाणाला भेट दिली होती. या युद्धात १५ लाख भारतीय जवानांनी प्राणाहुती दिली होती. ‘सेवा परमो धर्म’ हीच भूमिका भारताने कायम निभावली आहे. फ्रान्समध्ये भारतीय जवानांच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेल्या स्मारकावर जाऊन मी त्यांना नमन केले, असे मोदी म्हणाले. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर आपण कायदा हातात घेऊन जाळपोळ करतो. पण, यामुळे अपघातात मृत झालेले परत येत नाहीत. भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आपले सरकार प्रयत्न करणार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22311

Posted by on Apr 28 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1746 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२६ एप्रिल] - आयकर खात्याने आपल्या धोरणाचा भाग म्हणून सरकारचा १५०० कोटी रुपयांचा कर थकविणार्‍या ३१ बड्या करबुडव्यांची ...

×