Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » प्रत्येक शहरात सायबर लॅब उभारणार

प्रत्येक शहरात सायबर लॅब उभारणार

=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती=
Devendra-Fadnavis-6मुंबई, [३० मार्च] – राज्यात सायाबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर भावना भडकविणार्‍या पोस्ट टाकल्या जात आहेत. अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात एक सायबर लॅब उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी सोमवारी कायदा सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना विधान परिषदेत दिली.
राज्यात सध्या केवळ मुंबईत सायबर लॅब आहे. या लॅबवर मोठा ताण येत असून, त्यामुळे गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सायबर क्राईमचे गुन्हे शुक्रवारी रात्रीच घडतात. अशा साईट्‌स बंद करण्यासाठी दिल्लीला जावे लागते. तोवर बराच कालावधी जातो. या कालावधीत दंगली भडकण्याशक्यता असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्यासाठी राज्याच्या प्रत्येक शहरात सायबर लॅब स्थापन करण्यात येईल. अशा सायबर लॅबमध्ये १० कर्मचारी आणि ५ पोलिस अधिकारी असतील. या लॅबमुळे इंटरनेटमार्फत होणारी आर्थिक फसवणूक, भावना भडकविणार्‍या पोस्ट, अश्‍लील साहित्य अशा गुन्ह्यांचा तपास गतीने करणे शक्य होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आक्षेपार्ह पोस्ट तेथून हटविणारी कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही संस्था सध्या दिल्लीत आहे. तिची एक शाखा मुंबईत स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार आहोत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
एक हजार पोलिसांचा सायबर फोर्स स्थापन करणार
सायबर लॅबखेरीज मुंबईत एक हजार पोलिसांचा सायबर फोर्स लवकरच स्थापन करण्यात येईल. या फोर्समधील कर्मचार्‍यांना नॅसकॉम या प्रख्यात आयटी संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली

Short URL: https://vrittabharati.in/?p=21836

Posted by on Mar 31 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1825 of 2451 articles)


=फॉकनर सामना, तर स्टार्क मालिकावीर= मेलबर्न, [२९ मार्च] - बांगलादेशविरुद्धच्या सामन्यावर निसर्गाने फिरविले पाणी, न्यूझीलंड संघाकडून साखळी फेरीत झालेला पराभव ...

×