Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » प्रसंगी तुरुंगात जाईन, पण दंड भरणार नाही

प्रसंगी तुरुंगात जाईन, पण दंड भरणार नाही

=आम्ही चुकीचे काहीही केले नाही: श्री श्री रविशंकर यांची स्पष्ट भूमिका=
Sri-Sri-Ravi-Shankar-in-Berlinनवी दिल्ली, [१० मार्च] – यमुना नदीच्या तिरावर आयोजित विश्‍व सांस्कृतिक महोत्सवाला परवानगी देताना राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला पाच कोटींचा दंड भरण्यास आर्ट ऑल लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी नकार दिला असून, प्रसंगी तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘आम्ही चुकीचे म्हणता येईल असे काहीही केले नाही. आतापर्यंत आम्ही निष्कलंक आहोत आणि पुढेही राहू. प्रसंगी आम्ही तुरुंगात जाऊ, परंतु एक पैसाही दंड भरणार नाही’, असे श्री श्री रविशंकर यांनी आज गुरुवारी स्पष्ट केले. हरित लवादाच्या निर्णयावर आर्ट ऑफ लिव्हिंग समाधानी नाही आणि या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी ट्विट करून आधीच स्पष्ट केले होते. शिवाय राजकीय पक्षांनी या महोत्सवाला राजकीय मुद्दा बनवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
या महोत्सवाची तयारी सुरू असताना एकही झाड पाडलेले नाही. काही ठिकाणी सपाटीकरण करण्यासाठी झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या आहेत, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे या महोत्सवाला उपस्थित राहतील, अशी आशा व्यक्त करून, विरोधासाठी विरोध करणार्‍यांनाही सद्‌बुद्धी मिळेल, असेही ते म्हणाले.
हा महोत्सव म्हणजे सांस्कृतिक ऑलिम्पिक आहे. जगभरातील सुमारे ३७ हजार कलावंत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. लोकांना जवळ आणण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आहे. अशाप्रकारच्या भव्य आयोजनाचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे, असे श्री श्री रविशंकर यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय हरित लवादाने बुधवारी विश्‍व सांस्कृतिक महोत्सवाला परवानगी देताना या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगला पाच कोटींचा दंड ठोठावला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27216

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (699 of 2452 articles)


=बाबरी मशिद प्रकरण= नवी दिल्ली, [१० मार्च] - भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती ...

×