प्रीतम मुंडेंचा विक्रमी मताधिक्याने विजय
Tuesday, October 21st, 2014=मुलींनी राखला वडिलांचा गड=
मुंबई, [१९ ऑक्टोबर] – दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांचा अनुक्रमे बीड आणि परळी हा गड यशस्वीपणे कायम राखला आहे. विशेषत: प्रीतम मुंडे यांनी तर बीड लोकसभेची जागा विक्रमी ६.९२ लाखांच्या फरकाने जिंकली आहे. पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभेची जागा आणि प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभेची जागा लढविली. पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उभा असलेला आपला चुलत भाऊ धनंजय मुंडे यांचा २५,८९५ मतांनी पराभव केला. पंकजा यांना ९६,९०४ आणि धनंजय यांना ७१,००९ मते मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना नऊ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली. त्यांच्याविरुद्ध कॉंगे्रसच्या तिकिटावर मैदानात उतरलेले अशोक पाटील यांचा त्यांनी ६.९२ लाख एवढ्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला. इतक्या मोठ्या फरकाने लोकसभेची निवडणूक जिंकण्याची आजवरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी.
Short URL: https://vrittabharati.in/?p=17515

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!