Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाचे नवे धोरण लागू

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाचे नवे धोरण लागू

swachha bharat abhiyanनवी दिल्ली, [१८ मार्च] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वातील पर्यावरण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. मंत्रालयाने आज प्लॅस्टिक कचर्‍याच्या व्यवस्थापनाचे नवे महत्त्वपूर्ण धोरण लागू केले आहे.
इंदिरा पर्यावरण मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत या धोरणाची माहिती देताना वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर म्हणाले की, कचरा व्यवस्थापनाचा कायदा आतापर्यंत नगरपालिका क्षेत्रापर्यंत लागू होता, त्याची व्याप्ती आता ग्रामपंचायत स्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सहा लाख ग्रामपंचायतींना प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाचे धोरण राबवावे लागणार आहे.
यावेळी कचरा उचलण्याची जबाबदारी प्रथमच निश्‍चित करण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होतो, अशा ठिकाणांना म्हणजे कार्यालय, उद्योग आणि व्यापारी प्रतिष्ठानांना कचरा एका ठिकाणी गोळा करून तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कचरा वाहून नेणार्‍या यंत्रणेकडे सोपवावा लागेल. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्धारित केलेले शुल्कही या उद्योगांना द्यावे लागणार आहे.
देशात दररोज १५ हजार टन प्लॅस्टिक कचरा गोळा होतो, त्याचप्रमाणे गोळा करता न येणारे प्लॅस्टिक सहा हजार टन आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणचा प्लॅस्टिक कचरा उचलण्याची जबाबदारी त्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर तसेच लग्नसमारंभातील प्लॅस्टिक कचर्‍याची जबाबदारी ज्याच्या घरचा कार्यक्रम आहे, त्याच्यावर टाकण्यात आली आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
जे खाद्यपदार्थ प्लॅस्टिकच्या पॅकिंगमधून देण्यात येतात, ते गोळा करण्याची जबाबदारी त्या खाद्यपदार्थाच्या उत्पादकावर टाकण्यात आली आहे, यासाठी खाद्यपदार्थ वितरित करण्यासाठी उपयोगात येणार्‍या विक्रेत्यांच्या साखळीचा उपयोग केला जाणार असल्याचे नमूद करीत जावडेकर म्हणाले की, टेट्रापॅकही येत्या दोन वर्षांच्या काळात टप्प्याटप्प्याने काढून घेतले जाणार आहे.
दुधासाठी आतापर्यंत ४० मायक्रॉनच्या पिशव्या वापरल्या जात होत्या, त्याची जाडी आता ५० मायक्रॉन केली जाणार आहे, असे स्पष्ट करीत जावडेकर म्हणाले की, थर्मोसेटच्या वापरांवरही निर्बंध घालण्यात आले आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक तत्वही जारी केली आहेत. प्लॅस्टिक कचर्‍याच्या पाठोपाठ अन्य प्रकारचा कचरा व्यवस्थापनाचे धोरणही लवकरच जाहीर केले जाईल, असे जावडेकर म्हणाले.
यावेळी मंत्रालयाचे डॉ. एम. एम. कुट्टी, अशोक लवासा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27431

Posted by on Mar 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (623 of 2453 articles)


=आतंकवाद व धर्माची सांगड नको : मोदी= [gallery ids="27421,27423,27424"] नवी दिल्ली, [१७ मार्च] - चहुबाजूने हिंसेचा अंध:कार दाटून येत असताना ...

×