किमान तापमान : 28.51° C
कमाल तापमान : 28.94° C
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 2.99 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.94° C
28.24°C - 30.18°C
broken clouds28.16°C - 30.18°C
few clouds27.76°C - 28.89°C
broken clouds27.48°C - 29.11°C
scattered clouds27.32°C - 28.94°C
sky is clear27.07°C - 29.18°C
sky is clearमुंबई, [२३ एप्रिल] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जर्मनीत झालेल्या मेळ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारपासून इस्रायल दौर्यावर जाणार आहेत. याशिवाय पुढील महिन्यात मुख्यमंत्री जपानचाही दौरा करणार आहेत.
इस्रायलमध्ये ‘ऍग्रिटेक इस्रायल २०१५’ हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील हे अत्यंत महत्त्वाचे प्रदर्शन असते. तेल अवीवच्या इस्रायल ट्रेड फेअर्स ऍण्ड कन्व्हेंशन सेंटर येथे हे प्रदर्शन होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. इस्रायलमध्ये शेतीत वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात कसे वापरता येईल याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा इस्रायल दौरा आहे. याशिवाय महाराष्ट्राला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनविणे हादेखील या दौर्याचा उद्देश आहे, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
इस्रायलहून परतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस येत्या १३ मे पासून चार दिवसांच्या जपान दौर्यावर जाणार आहेत. आपल्या या दौर्यात मुख्यमंत्री फडणवीस ओसाका येथे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन’ या परिसंवादात सहभागी होतील, अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.