Home » क्रीडा, ठळक बातम्या » फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत फिक्सिंग?

फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत फिक्सिंग?

=कॅमरूनच्या ७ खेळाडूंवर फिक्सिंगचे आरोप=
सल्वाडोर, [१ जुलै] – आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉलमध्ये मॅच फिक्सिंग होण्याच्या प्रकरणांनी फिफा विश्‍वचषकाला देखील आपल्या जाळ्यात ओढले की काय? अशीच शंका सध्या वाटू लागली आहे. ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्‍वचषकात आफ्रिकेतील देश कॅमरूनचे सात खेळाडू फिक्सिंगमध्ये सहभागी होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
कॅमरूनच्या सूत्रांनी सांगितले की, ते आपल्या खेळाडूंविरूद्ध लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगणार आहे. विश्‍वचषकाच्या साखळी गटात लाजिरवाणी कामगिरी केल्यानंतर, स्पर्धेबाहेर पडलेल्या कॅमरून संघाच्या सात खेळाडूंवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होण्याचा दावा करण्यात आला होता.
कॅमरून संघाने स्पष्ट केले की, आम्ही शिस्तसमितीला या आरोपांबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्यात तीन सामन्यात आमच्या खेळाडूंवर फिक्सिंगमध्ये सहभागी होण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. कॅमरूनला मनाउसमध्ये खेळण्यात आलेल्या क्रोएशिया विरूद्धच्या सामन्यात ०-४ ने लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. हा सामना फिक्स असल्याची शंका देखील उपस्थित करण्यात येत आहे. विश्‍वचषक सामन्यात कुठल्याही प्रकारचा धोका आणि आमच्या संघात ७ भ्रष्टाचारी खेळाडू असलेले आरोप आमच्या सिद्धांताच्या विरूद्ध आहेत याकडेही कॅमरूनच्या पदाधिकार्‍यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13853

Posted by on Jul 2 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2408 of 2455 articles)


=उपान्त्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश= ब्राझिलिया, [३० जून] - माजी विजेता फ्रान्सने मध्यंतरानंतर पॉल पोग्बाचा गोल आणि जोसेफ योबोच्या आत्मघाती गोलच्या ...

×