Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » ‘फिफा’ विश्‍वचषकापेक्षा कुंभमेळ्याचे आयोजन उत्तम

‘फिफा’ विश्‍वचषकापेक्षा कुंभमेळ्याचे आयोजन उत्तम

kumbhmela nashikनवी दिल्ली, [२२ ऑगस्ट] – जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेली स्पर्धा म्हणजे फिफाकडून आयोजित केली जाणारी फुटबॉल विश्‍वचषक आणि जगात सर्वाधिक गर्दी होणारा धार्मिक सोहळा म्हणजे भारतात आयोजित होणारा महाकुंभमेळा! या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन म्हणजे तारेवरची कसरतच असते. पण, यातील कोणत्या कार्यक्रमाचे सर्वात उत्तम आयोजन करण्यात आले, या प्रश्‍नाचे उत्तर ‘महाकुंभमेळा’ असेच आहे…!
प्रथमदर्शनी या प्रश्‍नाच्या उत्तरात कुणीही फिफा विश्‍वचषक हाच पर्याय निवडण्याचा विचार करेल. पण, थांबा हॉर्वर्ड विद्यापीठाच्या दक्षिण आशिया केंद्राने संपूर्ण अभ्यास आणि विश्‍लेषण करून महाकुंभमेळा या पर्यायाची निवड केली आहे. या विद्यापीठातील विचारवंतांनी यावर नुकतेच एका पुस्तकाचे विमोचन केले आहे. २०१३ मधील महाकुंभमेळ्याचे आयोजन ब्राझीलमधील फिफा विश्‍वचषकापेक्षाही उत्तमरीत्या करण्यात आले होते, असे या विचारवंतांनी आपल्या अभ्यासपूर्ण अहवालात म्हटले आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत नुकतेच या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. या पुस्तकात महाकुंभमेळ्याच्या आयोजनावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. निरुत्साही आणि कामचुकार नोकरशहा असा आरोप नेहमीच होणार्‍या भारतासारख्या देशात देश-विदेशातून लाखो लोकांचा सहभाग असणार्‍या महाकुंभमेळ्याचे आयोजन मात्र अतिशय उत्तमरीत्या करण्यात आले, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.
२०१४ मध्ये ब्राझीलमध्ये आयोजित फिफा विश्‍वचषकाच्या अतिशय सुमार आयोजनावरून त्या देशात प्रचंड गदारोळ उडाला होता. तर, २०१० मध्ये भारताच्या राजधानीत आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्याने गाजली होती. या दोन्ही जागतिक स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो आणि केंद्रीय सरकारचाही प्रत्यक्ष सहभाग असतो. पण, असे असतानाही दोन्ही स्पर्धांचे आयोजन वादातच अडकले होते.
या अहवालानुसार, विद्यापीठातील सुमारे ५० प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकार्‍यांनी २०१३ मध्ये अलाहाबादेतील महाकुंभमेळ्याला भेट दिली होती. जगभरातील लाखो भाविक येथे येत असल्याने निर्माण होणार्‍या समस्या जाणून घेण्यासाठी ही भेट होती. काही दिवस याच परिसरात राहून या पथकाने अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद केली आणि याच आधारे या पथकाने फिफा विश्‍वचषकापेक्षाही कुंभमेळ्याचे आयोजन श्रेष्ठ असल्याचा निष्कर्ष काढला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23662

Posted by on Aug 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1514 of 2453 articles)


=अशीही मोदीभक्ती= जयपूर, [२२ ऑगस्ट] - पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ देशातच नाही, तर विदेशातही प्रचंड लोकप्रिय आहेत, याची अनेक उदाहरणं ...

×