Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » फेब्रुवारीत आंतरराष्ट्रीय नौदल संचलन

फेब्रुवारीत आंतरराष्ट्रीय नौदल संचलन

warship paradeनवी दिल्ली, [१५ ऑक्टोबर] – विशाखापट्‌टणम येथे बंगालच्या उपसागरात फेबु्रवारीमध्ये यंदाचे आंतररा ष्ट्रीय नौदल संचलन होणार आहे. ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान हे नौदल संचलन होणार आहे. भारत या संचलनाचे यजमानपद भूषविणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. या संचलनात ४५ पेक्षा जास्त देशांच्या युद्धनौका सहभागी होणार आहेत.
नियोजनानुसार ६ फेबु्रवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाची पाहणी करतील, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. या सोहळ्‌यात चीन सहभागी होणार असून पाकिस्तानने मात्र सहभागी होण्यास नकार दिला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाचे बोधचिन्ह डॉल्फिन आहे. या संचलन सोहळ्यासाठी संगीताची एक विशेष धून आणि गाणे तयार करण्यात आले आहे. तसेच सोहळ्यासाठी एक विशेष संकल्पनाही निश्‍चित केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी २००१ मध्ये मुंबईत अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय नौदल संचलन झाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25134

Posted by on Oct 15 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1338 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] - राजधानी दिल्लीतील औरंगजेब मार्गाचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम, असे नामकरण करण्याच्या दिल्ली महापालिकेच्या निर्णयाला आव्हान ...

×