Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » फेसबुकवरूनही पाठविता येतील पैसे

फेसबुकवरूनही पाठविता येतील पैसे

=लवकरच सुरू होणार सेवा=
facebook1कॅलिफोर्निया, [१८ मार्च] – ज्यांच्या हाती मोबाईल आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश लोकांकडे फेसबुक या अत्याधुनिक सोशल नेटवर्किंग साईटस्‌चीही सुविधा उपलब्ध आहे. एकाचवेळी प्रचंड संख्येत मेसेज पाठविण्याची क्षमता असलेल्या या फेसबुकवरून आता आपल्या मित्र आणि नातेवाईकांना पैसेही पाठविणे सहज शक्य होणार आहे. यासाठी फेसबुक लवकरच अशी सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
फेसबुकच्या या सुविधेमुळे क्रेडिट कार्ड आणि बँक खात्याच्या सहाय्याने स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या कोणत्याही फेसबुक मित्राच्या खात्यात पैसे पाठविता येणार आहेत. या सुविधेची माहिती फेसबुकने आपल्या ब्लॉगवर दिली आहे.
एकीकडे इंटरनेटचे जाळे अधिकच अत्याधुनिक होत असताना स्पर्धेच्या जगात टिकाव धरण्यासाठी फेसबुक आपल्या युझर्सना नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात आता फेसबुक मित्राच्या खात्यात पैसे पाठविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली असून, ही सेवा सध्यातरी ऍपल आणि ऍण्ड्रॉईड मोबाईल डिव्हाईस आणि संगणकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युझर्सच्या सुरक्षिततेविषयी विशेष काळजी घेण्यात आली असून, ही सुविधा स्वीकारणार्‍या युझर्सकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. पैसे पाठविताना सुरक्षितता म्हणून पीआयएन क्रमांकही देण्याची सुविधा आहे. या सुविधेचा प्रारंभ आगामी काही महिन्यात अमेरिकेपासून होणार असल्याचे ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
या सुविधेचा वापर करण्याची पद्धतही ब्लॉगवर देण्यात आली आहे. आपल्या ऍण्ड्रॉईड फोनवरील फेसबुकच्या मेसेंजर ऍपद्वारे मित्रांशी संवाद साधा आणि त्यानंतर ऍपमधील मेन्युतील एका विशिष्ट बटनाला टच करून रकमेचा आकडा लिहा. त्यानंतर ‘पे’ वर टच करून डेबिट कार्डची माहिती द्या. त्याचप्रमाणे पैसे स्वीकारण्यासाठी ज्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत, त्याच्याशी मॅसेंजर ऍपद्वारे चॅट करा आणि ऍड कार्डमध्ये जाऊन आपल्या डेबिट कार्डची माहिती द्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21562

Posted by on Mar 19 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1887 of 2458 articles)


नवी दिल्ली, [१८ मार्च] - कोळसा आणि खाण तसेच खनिज यावरील सुधारित विधेयक पारित करण्यासाठी गरज पडल्यास संसद अधिवेशनाच्या पहिल्या ...

×