Home » क्रीडा, ठळक बातम्या » फेसबुकवर चढलाय फुटबॉल विश्‍वचषकाचा ज्वर!

फेसबुकवर चढलाय फुटबॉल विश्‍वचषकाचा ज्वर!

साओ पाउलो, [१ जुलै] – यंदाची ब्राझीलमधील फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा एक अब्ज पोस्ट, लाइक आणि कमेंट्‌स यामुळे फेसबुकवर जोरदार गाजते आहे.
फेसबुकला फुटबॉल फिवर झाला की काय? असेच चित्र सध्या दिसते आहे. इतिहासात पहिल्यांदाच ही विश्‍वचषक स्पधार्र् अर्ध्या टप्प्यातच फेसबुकवर सर्वात जास्त प्रचलित झाली आहे. फेसबुकवर १२ ते २९ जून दरम्यान, फुटबॉल विश्‍वचषकाबाबत गप्पागोष्टी करणार्‍यांमध्ये २२ कोटी यूजर्स सहभागी झाले आहेत आणि एक अब्ज पोस्ट करण्यात आले आहेत. विश्‍वचषकाचा हा फिवर अद्यापही दोन आठवडा चालेल. अशातच अजून नवे विक्रम होण्याची शक्यता आहे.
कंपनीचे संचालक निक ग्रुडिन म्हणाले की, फेसबुकवरील फुटबॉल विश्‍वचषकाच्या या स्पर्धेबाबत लोकांचे चॅट्‌स, लाइक आणि कमेंट यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहून आश्‍चर्यच वाटते.
फुटबॉलचा फेसबुकवरील फिवर इतका वाढला आहे की, पहिल्या आठवड्यातच फेसबुकवर ४५.९ कोटी लोकांनी मेसेज पाठविले आहेत. ही संख्या यावर्षी सुपर बॉलबाबत करण्यात आलेल्या गप्पागोष्टींपेक्षा अधिक आहे. गत शनिवारी ३.१ कोटी लोकांपेक्षा अधिक लोकांनी ब्राझीलच्या चिलीवर झालेल्या विजयासाठी ७.५ कोेटी पोस्ट, लाइक आणि कमेंट केले. ही विश्‍वचषक स्पर्धा जगातील लोकांना एकमेकांना जोडणार्‍या सेतूचे काम करत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13859

Posted by on Jul 2 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2407 of 2455 articles)


=कॅमरूनच्या ७ खेळाडूंवर फिक्सिंगचे आरोप= सल्वाडोर, [१ जुलै] - आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉलमध्ये मॅच फिक्सिंग होण्याच्या प्रकरणांनी फिफा विश्‍वचषकाला देखील आपल्या ...

×