Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » फेसबुक, ट्विटरच्या सीईओला इसिसची धमकी

फेसबुक, ट्विटरच्या सीईओला इसिसची धमकी

facebook-twitterनवी दिल्ली, [२५ फेब्रुवारी] – इराक व सीरियाच्या मोठ्या भूभागावर कब्जा केल्यानंतर जगाच्या अनेक भागात धुमाकूळ घालणार्‍या इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया अर्थात इसिस या धोकादायक दहशतवादी संघटनेने सोशल मीडियात आघाडीवर असलेल्या फेसबुक आणि ट्विटर या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना (सीईओ) धमकावले आहे.
इसिसने २५ मिनिटांचा एक व्हिडीओ प्रसारित केला असून, यामध्ये फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग व ट्विटरचे सीईओ जॅक दोर्से यांना वारंवार दाखविण्यात येऊन त्यांना धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाचा दहशतवादी कारवायांसाठी गैरवापर होऊ न देण्याचा निर्धार करून तसे प्रयत्न फेसबुक व ट्विटरकडून करण्यात आल्यानंतर इसिसने ही धमकी दिली आहे.
मार्क झुकेरबर्ग, जॅक दोर्से व तुमची सरकारे, तुम्ही दररोज घोषणा करता की आम्ही दहशतवाद्यांची इतकी खाती बंद केली. परंतु, आमच्या मते तुम्ही फक्त एवढेच करू शकता. तुम्ही एक अकाऊंट बद कराल तर आम्ही १० नवे अकाऊंट सुरू करू आणि तुमचेही नामोनिशाण मिटवून टाकू. आम्ही सत्य बोलतो याची अल्लाला कल्पना आहे, असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.
आतापर्यंत फेसबुकची १० हजार खाती, १५० फेसबुक ग्रुप आणि पाच हजारांपेक्षा जास्त ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचा दावाही इसिसने केला आहे. यापैकी बहुतांश खाती दहशतवाद समर्थकांना देण्यात आली आहे, असेही त्यात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26884

Posted by on Feb 25 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (816 of 2458 articles)


=सभापतींकडून गडकरींची प्रशंसा= नवी दिल्ली, [२५ फेब्रुवारी] - प्रश्‍नोत्तराच्या तासात दिलेल्या मुद्देसूद आणि समाधानकारक उत्तराबद्दल लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी ...

×