Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » फेसबूकवरून केलेले प्रेम जिवावर बेतले

फेसबूकवरून केलेले प्रेम जिवावर बेतले

=१६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, जोगेश्‍वरीत घडला थरार=
facebook1मुंबई, [८ जून] – फेसबूकच्या माध्यमातून झालेली ओळख युवतीला चांगलीच महागात तिला जीव गमवावा लागला. एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय प्रियकराने १६ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या केली. मुंबईतील जोगेश्‍वरीमध्ये शनिवारी रात्री हा थरार घडला. प्रतीक कुबल असे या तरुणाचे नाव आहे. युवतीला ठार केल्यानंतर प्रतीकने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याचीही प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर जोगेश्‍वरीतील ट्रॉमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रतीक कुबल हा हार्डवेअर अभियंता आहे. तो कुटुंबासह विरारमध्ये राहतो. त्याची जोगेश्‍वरी परिसरात राहणार्‍या १६ वर्षीय तरुणीशी ओळख झाली. प्रतीक आणि पीडित युवती हे दोघेही मूळचे मालवण (जि. सिंधुदुर्ग) चे आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे फेसबूकच्या माध्यमातून संवाद वाढला. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्याचे सांगण्यात येते.
१६ वर्षीय युवती अभ्यासापेक्षा फेसबुकवरच चॅटिंगमध्ये अधिक वेळ घालवत असल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यामुळे घरच्यांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. तसेच दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुणही मुलीच्या घरच्यांना लागली होती. त्यामुळे मुलगी प्रतीकला भेटण्याचे टाळत होती.
यानंतर प्रतीकने संबंधित युवतीला भेटण्यासाठी वारंवार विनंती केली. पण तीने नकार दिला. यानंतर प्रतीकने शनिवारी तिला फक्त एकदाच भेटण्याची विनंती केली. प्रतीककडे दोघांचे एकत्र फोटो होते, ते सुद्धा मुलीला परत घ्यायचे होते. त्या उद्देशानेच ती प्रतीकला भेटण्यास गेली होती.
दोघांनीही जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंकरोडजवळच्या तलावाजवळ भेटण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांची भेट झाली. मात्र, यापुढे आपण एकदाही भेटणार नाही, असे मुलीने प्रतीकला सांगितल्याने तो संतप्त झाला. त्याने थेट चाकू काढून मुलीवर सपासप चार वार केले. त्यानंतर प्रतीकने स्वत:वरही वार करून घेतले. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रतीकला पोलिसांच्या स्वाधीन केले, तर मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी जखमी प्रतीकलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर हत्येमागचे नेमके कारण विचारण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
घटनास्थळी पोलिसांना दारूची बाटली आणि काही फोटो आढळले आहेत. प्रतीकने नशेत तरुणीची हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22749

Posted by on Jun 9 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1649 of 2452 articles)


=पंतप्रधान मोदींनी स्वीकारला पुरस्कार • देशवासीयांसाठी अभिमानाचा दिवस असल्याचे प्रतिपादन= ढाका, [७ जून] - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान केल्याबद्दल बांगलादेशने ...

×