Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » फोर्ड फाऊंडेशनवर कारवाई

फोर्ड फाऊंडेशनवर कारवाई

=अमेरिकेने भारताला मागितले स्पष्टीकरण=
ford foundationवॉशिंग्टन, [२५ एप्रिल] – फोर्ड फाऊंडेशन आणि ग्रीनपीस या स्वयंसेवी संस्थांवर भारताने केलल्या कारवाई प्रकरणी अमेरिकेने चिंता व्यक्त केली असून, भारताकडे स्ष्टीकरण मागितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मेरी हर्फ यांनी वॉशिंग्टनमधील पत्रकार परिषदेत बोलताना भारताकडून याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले असल्याचे सांगितले. भारत सरकारने ग्रीन पीस इंडिया या संस्थेची नोंदणी रद्द केली, असून फोर्ड फाऊंडेशनचा समावेश तपासणी यादीत केला आहे. विदेशी योगदान नियमन कायद्यामुळे (फेमा) भारतातील सामाजिक संघटनांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे आणि याची अमेरिकेला चिंता आहे. हे निर्णय घेण्यामागे भारत सरकारची नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही त्यांना स्पष्टीकरण मागितले आहे, असे हर्फ यांनी माध्यमांना सांगितले.
स्वयंसेवी संस्थांना परदेशांमधून मिळणार्‍या देणग्यांवर आता सरकारची करडी नजर असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर फोर्ड फाऊंडेशनकडून येणारा निधी मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय देशात येऊ शकणार नाही, असा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सर्व बँकांना या दोन्ही संस्थांसोबत भारतातील व्यक्ती, संस्था किंवा स्वयंसेवी संस्थेसोबत झालेल्या आर्थिक व्यवहाराची विशेष नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, या संघटनांकडून येणारा पैसा, राष्ट्रीय हित आणि संरक्षाशी संबंधित कामांवरच खर्च केला जाणे अपेक्षित आहे. याच निर्णयाअंतर्गत ग्रीनपीस संस्थेची देशातील सर्व सात बँकखाती गोठविण्यात आली आहेत.
तत्पूर्वी, गुजरात सरकारने फोर्ड फाऊंडेशनच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. अमेरिकेतील ही संस्था भारताच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करीत असून जातीयवादाला प्रोत्साहन देण्यासाठी तिस्ता सेटलवाडसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22244

Posted by on Apr 26 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1759 of 2458 articles)


मुंबई, [२३ एप्रिल] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जर्मनीत झालेल्या मेळ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

×