Home » क्रीडा, ठळक बातम्या » फ्रान्सचा नायजेरियावर २-० नी विजय

फ्रान्सचा नायजेरियावर २-० नी विजय

=उपान्त्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश=
ब्राझिलिया, [३० जून] – माजी विजेता फ्रान्सने मध्यंतरानंतर पॉल पोग्बाचा गोल आणि जोसेफ योबोच्या आत्मघाती गोलच्या आधारावर नायजेरियाचा २-० असा पराभव केला. या विजयामुळे फ्रान्सने २० व्या फीफा विश्‍वचषक स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
फ्रान्सचा स्टार खेळाडू पोग्बाने निर्धारित वेळेच्या ११ मिनिटे आधी नायजेरियाचा गोलरक्षक विंसेंट एयीमाला चकवून अतिशय सुरेख हेडरवर गोल केला. नंतर शेवटच्या मिनिटाला मथियू वाल्बूनाच्या फटक्यावर याबोने चेंडू आपल्याच संघाच्या जाळ्यात अडकवला. या पराभवामुळे नायजेरियाचे पहिल्यांदाच उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. शुक्रवारी फ्रान्सचा सामना उपान्त्यपूर्व फेरीत जर्मनी अथवा अल्जीरियाशी होईल.
आजचा पराभव फ्रान्समध्ये वसलेल्या नायजेरियाचा गोलरक्षक एंयीमासाठीदेखील खूप निराशाजनक ठरला आहे. त्याने संपूर्ण स्पर्धेत अनेक संभाव्य गोल वाचवून नायजेरियाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.
फ्रान्सच्या संघाने अतिशय चांगली सुरुवात केली. मात्र, मथियू मैदानात उतरताच फ्रान्सचा संघ अधिकच आक्रमक झाला. मात्र, पहिल्या मध्यंतरात एकही गोल झाला नाही. फ्रान्सला ४० व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, ती वाया गेली. मध्यंतरानंतर मात्र फ्रान्सने अधिकच आक्रमक खेळ केला. याचा फायदा घेत पॉल पोग्बाने सुरेख गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13818

Posted by on Jul 1 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2409 of 2455 articles)


पुणे, [३० जून] - अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थेत दिसत असलेली सुधारणा चांदीच्या दरवाढीचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जगभरात ...

×