Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » फ्रान्सचा पुन्हा हवाई हल्ला

फ्रान्सचा पुन्हा हवाई हल्ला

  • इसिसचे कमांड सेंटर उद्‌ध्वस्त
  • शस्त्रागारात स्फोटांची मालिका

WAR_FrenchFighterJetsपॅरिस, [१७ नोव्हेंबर] – पॅरिस हल्ल्याचा बदला घेण्यासाठी फ्रान्सच्या हवाई दलाने आज मंगळवारीही इसिसचा बालेकिल्ला असलेल्या राक्का येथील गुप्त अड्ड्यांवर जोरदार हल्ले चढविले. यात इसिसचे कमांड सेंटर आणि शस्त्रागारातील स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात नष्ट झाला.
अवघ्या चोवीस तासांत फ्रान्सने इसिसवर केलेला हा दुसरा मोठा हल्ला होय. सीरियातील राक्का शहरावर इसिसचे नियंत्रण असून, याच शहराला या जहाल दहशतवादी गटाने आपले मुख्यालय बनविले आहे. मंगळवारी पहाटेपासूनच फ्रान्स हवाई दलातील १० राफेल आणि मिराज लढाऊ विमानांनी इसिसवर बॉम्बवर्षाव केला. अवघ्या काही मिनिटांतच १६ बॉम्ब टाकण्यात आले, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील प्रवक्त्याने दिली.
राक्का येथील इसिसच्या शस्त्रागारावर बॉम्ब पडल्याने तिथे स्फोटमालिकाच सुरू झाली. शस्त्र व स्फोटकांचा मोठा साठा यात उद्‌ध्वस्त झाला, असे प्रवक्ता म्हणाला.
दरम्यान, पॅरिस हल्ल्यातील सूत्रधारांना जेरबंद करण्यासाठी फ्रान्स पोलिसांनी मंगळवारीही देशभरात व्यापक धाडी टाकल्या. सोमवारी रात्रीपासूनच हे धाडसत्र सुरू झाले होते. यात १२८ ठिकाणांची झडती घेण्यात आली. पोलिसांनी या धाडसत्रात २३ जणांना अटक केली असून, ३१ शस्त्रे व रॉकेट लॉन्चर्स ताब्यात घेतले आहे, असे पोलिस सूत्राने सांगितले.
दूतावासांची सुरक्षा वाढवली
इसिसकडून आणखी हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, रशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्की आणि इस्रायल यासारख्या देशांच्या येथील दूतावासांना कडेकोट सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे. दूतावासांना लक्ष्य बनवून होणारा कोणताही हल्ला परतवून लावण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25515

Posted by on Nov 18 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1228 of 2458 articles)


=शुक्रवारपासून अंमलबजावणी= नवी दिल्ली, [१७ नोव्हेंबर] - कमी अंतराचा प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वेने आज मंगळवारी धक्का दिला. कमी अंतरासाठी आतापर्यंत ...

×