Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » बँकांचा संप मागे

बँकांचा संप मागे

=१५ टक्के वेतनवाढीचा झाला करार=
BANKING_WOMENSनवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] – सरकारसोबत १५ टक्के वेतनवाढीचा करार झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटनांनी बुधवारपासूनचा आपला चार दिवसांचा संप आज सोमवारी मागे घेतला.
कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात मुंबईत वेतनवाढीच्या मुद्यावर यशस्वी चर्चा झाली. कर्मचार्‍यांना १५ टक्के वेतनवाढ देण्याचा आणि त्याची अंमलबजावणी नोव्हेंबर २०१२ पासून करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे आम्ही आपला संप मागे घेतला आहे, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे संयोजक एम. व्ही. मुरली यांनी दिली.
दरम्यान, नॅशनल ऑर्गनायझेन ऑफ बँक वर्कर्सचे उपाध्यक्ष अश्‍विनी राणा यांनी या वेतनवाढीवर नाराजी व्यक्त केली. गेल्या वेळी कर्मचार्‍यांना १७.५ टक्के वाढ मिळाली होती. त्यामुळे तेवढ्याच वेतनवाढीची आम्हाला अपेक्षा होती. पण, ती पूर्ण झाली नाही. विशेष म्हणजे, या करारामुळे बँक कर्मचार्‍यांना महिन्यातून दोन शनिवार सुट्याही मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सुटी मिळावी, ही कर्मचार्‍यांची फार जुनी मागणी आता पूर्ण झाली आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे अ. भा. बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी. एस. व्यंकटचलम् यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20851

Posted by on Feb 24 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2017 of 2453 articles)


=भूमी अधिग्रहण अध्यादेशावर विरोधक सरकारला घेरणार= नवी दिल्ली, [२२ फेब्रुवारी] - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार, २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, ...

×