Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » बँकांचे आरोग्य उत्तम ठेवणार : जेटली

बँकांचे आरोग्य उत्तम ठेवणार : जेटली

Arun Jaitley10नवी दिल्ली, [२ मार्च] – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपले सरकार आवश्यक ती सर्वच पावले उचलण्यासोबत स्रोतांचा पुरवठाही करणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बुधवारी दिली.
सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर उद्योग क्षेत्रासोबत प्रथमच संवाद साधताना जेटली बोलत होते. कर्जाच्या थकबाकीचे प्रमाण फार जास्त असल्याने आणि कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडाल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर प्रचंड ताण आला आहे. या बँकांना योग्य तेवढे भांडवल उपलब्ध करून त्यांना मजबूत करण्यावर सरकार भर देत आहे, असे जेटली यांनी सांगितले.
खाजगी क्षेत्रातील बँका गुंतवणुकीवर विशेष भर देत असल्याने, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही अशाच प्रकारची पावले उचलायला हवी. आर्थिक शिस्त कायम राखतानाच देशी आणि विदेशी गुंतवणुकीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी व्यवसायाभिमुख वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मतही जेटली यांनी व्यक्त केले.
आर्थिक शिस्त कायम राखणे अतिशय आवश्यक आहे. आर्थिक शिस्त नसेल, तर भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था आहे, असा दावा आपण कदापि करू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26985

Posted by on Mar 3 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (782 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२ मार्च] - इशरत जहॉं ही लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब असल्याचे माहीत असतानाही केवळ भाजपाला, विशेषत: नरेंद्र मोदी यांना ...

×