Home » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » बंगळुरू स्फोट: अल्पवयीन मुलाला अटक

बंगळुरू स्फोट: अल्पवयीन मुलाला अटक

bangalore-blast2बंगळुरू, [३० डिसेंबर] – भारतातील सिलिकॉन व्हॅली अशी ओळख असलेल्या बंगळुरू शहरातील चर्च स्ट्रीटवर झालेल्या कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारण्यासह आणखी स्फोट घडविण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
या १७ वर्षीय हिंदू मुलाने अब्दुल खान नावाने ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर बनावट अकाऊंट तयार करून केलेल्या अनेक ट्विट्‌समध्ये बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा मुलगा बंगळुरू शहरालगत असलेल्या एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला शिकणारा विद्यार्थी आहे. दरम्यान, आपला मुलगा मानसिकदृष्ट्या त्रस्त आहे व सध्या त्याच्यावर औषधोपचार सुरू असल्यासंबंधीच्या दस्तावेजांसह त्याचे पालक पोलिस ठाण्यात येणार आहेत, असेही पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले.
‘मी अब्दुल बंगळुरू येथे झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारतो. दोन दिवसात आणखी दोन स्फोट. शक्य असेल तर मला अटक करून दाखवा. पोलिस माय फूट, इसिस,’ असे या मुलाने केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्याने आणखी एक ट्विट करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनाही धमकी दिली होती. ‘हे राजनाथसिंहजी, देखो दो दिन के बाद फिर ब्लास्ट करेगा’, असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19398

Posted by on Dec 31 2014. Filed under कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य (2296 of 2452 articles)


=चार मंत्र्यांनीही घेतली शपथ= रांची, [२८ डिसेंबर] - भाजपाचे वरिष्ठ नेते रघुवर दास यांनी आज रविवारी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पद ...

×