Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » बचत गटांना यापुढे बिनव्याजी कर्ज: पंकजा मुंडे

बचत गटांना यापुढे बिनव्याजी कर्ज: पंकजा मुंडे

pankaja-mundeनवी दिल्ली, [६ मार्च] – येत्या आर्थिक वर्षापासून राज्यातील बचत गटांना बिनव्याजी कर्ज दिले, अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज रविवारी येथे केली.
राजधानी दिल्लीत आयोजित महिला लोकप्रतिनिधींच्या परिषदेत बोलताना मुंडे म्हणाल्या की, महिला खूप इमानदार असतात, त्यामुळे महिला बचत गटांना देण्यात आलेल्या कर्जाची परतफेड १०० टक्के होत असते. त्यामुळेच महिला बचत गटांना पुढील आर्थिक वर्षापासून बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या अर्थसंकल्पात यासाठी तशी आर्थिक तरतूदही केली जाणार आहे.
बचत गटाच्या महिलांना बाराही महिने रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून बचत गटांसाठी मॉल उभारण्यात येतील, असे स्पष्ट करीत मुंडे म्हणाल्या की, बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.
बचत गटांनी गोळा केलेल्या प्लॅस्टिकचा वापर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या कामासाठी केला जाणार आहे. विशेष म्हणजे, बाजारभावापेक्षा जास्त भावाने सरकार या प्लॅस्टिकची खरेदी बचत गटांकडून करणार आहे, असे स्पष्ट करीत मुंडे म्हणाल्या की, यामुळे पर्यावरणाचे तर रक्षण होणार आहे, पण बचत गटांची आर्थिक स्थितीही सुधारणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी राज्य सरकारने ३०० कोटी रुपये दिले असून, कन्या भ्रृण हत्या थांबवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27067

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (750 of 2451 articles)


=अभाविपचा स्पष्ट आरोप= नवी दिल्ली, [६ मार्च] - छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतालनार गावाजवळ नक्षलवाद्यांनी एप्रिल २०१० मध्ये केलेल्या शक्तिशाली ...

×