बदली प्रकरणे ८ दिवसांत निकाली काढा
Wednesday, October 21st, 2015=सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचार्यांची बदली, सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश=
मुंबई, [२० ऑक्टोबर] – राज्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत करार पद्धतीने नेमण्यात आलेल्या कर्मचार्यांची बदली प्रकरणे आठ दिवसांत निकाली काढण्याचे निर्देश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना दिले आहेत.
मंत्रालयातील परिषद सभागृहात वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. एकतर्फी जिल्हा बदली संदर्भात कर्मचार्यांची ३० मे २०१३ च्या समायोजनामुळे गैरसोय झाली आहे. तेव्हा राज्यातील ४०७ गटसाधन केंद्र किंवा शहर साधन केंद्रांमध्ये प्रति सहा विषय साधनव्यक्ती किंवा विषयतज्ज्ञाच्या प्रमाणात डीपीईपी रिक्त जागेसह रिक्त असलेल्या ठिकाणी बजेटसह एकतर्फी जिल्हा बदलीस परवानगी मिळावी, अशी मागणी सर्व शिक्षा अभियान साधनव्यक्ती किंवा विशेष तज्ज्ञ प्रदेश महासंघाने केली होती. ती लक्षात घेऊन मुनगंटीवार यांनी या कर्मचार्यांची बदली प्रकरणे आठ दिवसात निकाली काढा, असे निर्देश शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना यावेळी दिले.
सर्व शिक्षा अभियानातील कर्मचार्यांचा विविध स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये वयाची अट शिथील करून अनुभव ग्राह्य धरला जावा, अशी मागणी केली असता, ही मागणी तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच या कंत्राटी कर्मचार्यांच्या वेतनवाढीबाबत इतर राज्यातील या पदावरील कर्मचार्यांना मिळत असलेल्या पगाराची माहिती तपासून योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
या बैठकीदरम्यान सर्व शिक्षा अभियानातील करार कर्मचार्यांना शासन सेवेत कायम सामावून घेणे, बाह्य संस्थेकडून कार्यरत करार कर्मचार्यांच्या ठिकाणी नवीन पदभरती करू नये, वेतनात वाढ करावी, एकतर्फी जिल्हा बदलीस परवानगी मिळावी, थकीत वेतन तातडीने मिळावे, भविष्य निर्वाह निधी लागू करणे, सेवा पुस्तक भरणे, सहा महिन्याची प्रसुती रजा मिळणे, आदी मागण्या कर्मचार्यांनी यावेळी केल्या.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25215

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!