Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » बराक ओबामा आहेत हनुमान भक्त

बराक ओबामा आहेत हनुमान भक्त

=भेट म्हणून स्वीकारली मूर्ती=
US President Barack Obama folds his hands in traditional Namaste style during his ceremonial welcome at Rashtrapati Bhavan in New Delhiनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – भगवान श्रीरामांच्या अस्तित्वावर पूर्वीच्या संपुआ सरकारने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. पण, महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा चक्क श्रीरामभक्त हनुमानाचे भक्त निघाले. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतभेटीवर आलेले ओबामा यांना राष्ट्रपती भवनातील हनुमानाची मूर्ती फार आवडली असून, ही मूर्ती त्यांनी भेट म्हणून स्वीकारली आहे आणि व्हाईट हाऊसमध्ये ठेवणार आहेत.
हनुमानाची मूर्ती भेट म्हणून मिळाल्यानंतर त्यांनी ती भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी यांना मोठ्या कुतुहलाने दाखविली. खासदार राजीव शुक्ला यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
आपण हनुमानाचे भक्त असल्याचे ओबामा यांनी यापूर्वी कधीच जाहीर केले नव्हते. तथापि, २००८ मध्ये ओबामा पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हापासून ते हनुमान भक्त असल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे, तरुणपणी ओबामा इंडोनेशियात होते. या देशात हिंदू देव-देवतांची अनेक मंदिरे आहेत. या देशात हनुमानाची चार हातांची मूर्ती आहे. तेथील रामायणातही हनुमानाला चार हात असल्याचा उल्लेख आहे. शुभशकून म्हणून ओबामा आपल्याजवळ ज्या वस्तू ठेवतात, त्यातही हनुमान मूर्तीचा समावेश असल्याची माहिती टाईम या साप्ताहिकाने २००८ मधील लेखातून दिली होती. याच काळात ओबामांच्या भारतातील काही चाहत्यांनी त्यांना सोन्याचा मुलामा असलेली दोन फूट उंच हनुमानाची मूर्ती भेट म्हणून पाठविली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20110

Posted by on Jan 28 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2161 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, ...

×