Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » बर्फ वितळण्याची वाट पाहाताहेत अतिरेकी

बर्फ वितळण्याची वाट पाहाताहेत अतिरेकी

=सीमेपासून तीन किमी. दूर=
Kashmir borderनवी दिल्ली, [५ मे] – सीमेपलीकडे जमा झालेले अतिरेकी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी बर्फ वितळण्याची वाट पाहात असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे. एवढेच नव्हे, तर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांविरोधात जास्तीत जास्त तीव्र निदर्शने करण्याबाबत फुटीरतावाद्यांच्या नेत्यांना सीमेपलीकडून निर्देश देण्यात येत असल्याचेही गुप्तचरांनी सांगितले.
देशात केलेल्या घुसखोरीबाबत गुप्त अहवालावरून गुरुवारी येथे गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. गृहमंत्री राजथानसिंह यांच्या अध्यक्षतेत दीड तास झालेल्या या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबत विस्तृत चर्चा झाली. यावेळी वरील माहिती देण्यात आली. अतिरेक्यांची घुसखोरी व फुटीरतावाद्यांची निदर्शने रोखण्यासाठी सीमेवर चौकशी वाढवण्याचे आणि सैन्यदलांच्या सुरक्षेलाही मजबूत करण्याबाबत गृहमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे केवळ तीन किमी. दूर अतिरेक्यांनी आपले बस्तान बसवले असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. अतिरेकी भारतीय सीमेच्या अतिशय जवळ असणे ही बाब भारतासाठी चिंतेचा विषय बनली आहे. कारण हे अतिरेकी आयएसआयच्या मार्गदर्शनाखाली भारतविरोधात कट रचत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28192

Posted by on May 6 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (370 of 2453 articles)


नवी दिल्ली, [५ मे] - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील घोटाळ्याचा तपास करणार्‍या सीबीआयने सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ...

×