Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » बलुचमधील हिंसाचारात भारताचा हात नाही

बलुचमधील हिंसाचारात भारताचा हात नाही

=पाकला झाली उपरती=
SartajAzizइस्लामाबाद, [२२ नोव्हेंबर] – पाकिस्तान-अफगाण सीमेवरील आदिवासी भागात विशेषत: वायव्य सरहद्दीतील बलुचिस्तानात सुरू असलेल्या अतिरेकी कारावायांमागे भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हात असल्याचा वारंवार आरोप करणार्‍या पाकिस्तानने अखेर या हल्ल्यांमागे भारताचा हात नसल्याचे मान्य केले आहे.
या भागातील हिंसाचार, अतिरेकी हल्ले आणि बॉम्बस्फोटांचा आमच्या गुप्तचर संस्थांनी सखोल तपास केला. पण, भारताचा हात असल्याचे कोणतेही ठोस पुरावे त्यांना मिळाले नाही. त्यामुळे पाकमधील हिंसाचारामागे भारताचा हात नाही, असेच जाहीर करणे आवश्यक झाले आहे, अशी माहिती पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी सिनेटच्या स्थायी समितीपुढे बोलताना दिली.
या कारवायांमध्ये भारताचाच सहभाग सिद्ध करणारे ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा करून, आम्ही ते भारताला पाठविले असल्याचे अझीज यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात सांगितले होते, हे याठिकाणी उल्लेखनीय. पण, आता त्यांच्यावरच भारताला क्लीन चिट देण्याची वेळ आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25658

Posted by on Nov 23 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1183 of 2458 articles)


=सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा= नवी दिल्ली, [२२ नोव्हेंबर] - ‘स्त्रीधन’ परत मागण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार घटस्फोट होणे आवश्यक नसते. घटस्फोट झालेला ...

×