Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » बहुतांश वचनांची पूर्तता : पर्रीकर

बहुतांश वचनांची पूर्तता : पर्रीकर

=‘वन रँक वन पेन्शन’=
manohar-parrikar9विशाखापट्टनम्, [७ फेब्रुवारी] – गेल्या ४२ वर्षांपासूून प्रलंबित असलेल्या ‘वन रँक वन पेन्शन’शी संबंधित बहुतांश वचनांची आपल्या सरकारने पूर्तता केली आहे. काही किरकोळ गोष्टी राहिल्या असतील, तर त्यावर तोडगा काढण्यासाठी एक सदस्यीय आयोग गठित करण्यात आला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज रविवारी येथे दिली.
भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वन रँक वन पेन्शन योजना मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. ही योजना मार्गी लावतानाच, ती कशाप्रकारे लागू होईल, याबाबतची सविस्तर माहिती देणारी अधिसूचना सरकारने जारी केली आहे. या योजनेकरिता वार्षिक ७५०० कोटी रुपयांचा आणि थकबाकी देण्यासाठी १०,९८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. थकबाकी चार समान हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक परिषदेच्या अनुषंगाने ते पत्रकारांशी बोलत होते.
काही माजी सैनिकांनी किरकोळ स्वरूपाचे आक्षेप घेतले आहेत. इतकी मोठी योजना निकाली काढताना सर्वांचेच समाधान करणे शक्य नसते. त्यामुळे ज्या गोष्टी राहून गेल्या आहेत, त्यासाठी आम्ही एक सदस्यीय आयोग गठित केला आहे. ज्या माजी सैनिकांना काही तक्रारी असतील, त्यांनी आयोगाकडे आपले मत मांडावे, असे पर्रीकर म्हणाले. सियाचीनमध्ये अलिकडेच हिमकडे कोसळून दहा जवानांचा मृत्यू झाला. ही घटना वेदनादायक आहे. परंतु, देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय थंड असलेल्या या भागात आम्हाला मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करणे आवश्यक असते, असेही पर्रीकर यांनी यावेळी सांगून त्या जवानांना आदरांजली अर्पण केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26781

Posted by on Feb 8 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (845 of 2453 articles)


पुरी, [७ फेब्रुवारी] - १२ व्या शतकातील भगवान जगन्नाथपुरी मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भेट दिली आणि पूजाअर्चना केली. ...

×