Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » बांगलादेशकडून दहशतवाद्यविरोधी कारवाई सुरू

बांगलादेशकडून दहशतवाद्यविरोधी कारवाई सुरू

India-Bangladesh-border-mapनवी दिल्ली, [१३ जून] – ईशान्ये भारतातील राज्यांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची कारवाई बांगलादेशच्या अधिकार्‍यांनी सुरू केली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने याविषयी माहिती दिली आहे.
सीमेवर विविध ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईची माहिती बांगलादेशकडून देण्यात आली असून उभय देशांदरम्यानच्या करारानुसार, लष्करी कारवाईच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यात येते. दोन्ही देशांचे संबंधित अधिकारी सीमा समन्वय बैठकीचे आयोजन करतात. या बैठकीतच भारतीय अधिकार्‍यांनी बांगलादेशातील दहशतवाद्यांच्या ३९ अस्थायी शिबिरांची यादी सोपविली होती. त्या यादीनुसार, लष्कराच्या कारवाईला सुरुवात झाल्याचे भारतीय अधिकार्‍यांनी सांगितले. या बैठकीत सीमा सुरक्षा दलाचे नेतृत्त्व मेघालय फ्रंटियर इन्स्पेक्टर जनरल सुदेश कुमार यांनी, तर बांगलादेशच्या वतीने अतिरिक्त महासंचालक लतीफुल हैदर यांनी केले.
त्या माध्यमातून सीमेवर राहणार्‍या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. या बैठकीत भारत आणि बांगलादेशी नागरिकांनीही परस्परांच्या बाजूने सीमेचे उल्लंघन होण्यासह चोरी, अपहरण आणि प्राण्यांच्या शिकारीचा मुद्दा उपस्थित केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22874

Posted by on Jun 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1620 of 2453 articles)


बुलढाणा, [१३ जून] - विदर्भ-मराठवाडा राज्य महामार्ग विकसित करून दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी खामगाव-चिखली-जालना तसेच मलकापूर ते शिर्डी आणि ...

×