Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » बांगलादेश करणार इस्लामचा त्याग!

बांगलादेश करणार इस्लामचा त्याग!

=प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन, सुप्रीम कोर्टातही याचिका=
bangladesh -MMAPढाका, [६ मार्च] – हिंदूंसह इतर धर्मातील अल्पसंख्यक नागरिकांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर, राजधर्म अशी ओळख असलेल्या इस्लामचा त्याग करण्याच्या प्रस्तावावर बांगलादेश सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याची माहिती आहे.
अलीकडील काळात बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांचे प्रमाण फार जास्त वाढले आहे. हिंदूंशिवाय, ख्रिश्‍चन आणि शिया मुस्लिमांवरही हल्ले होत आहेत. यातील बहुतांश हल्ल्यांमध्ये सुन्नी या कंटरपंथी संघटनेचा हात असल्याचे दिसून आले आहे. याच अनुषंगाने राजधर्म अशी ओळख असलेल्या इस्लामचे स्थान कायमचे रद्द करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिकाही येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, एक प्रस्ताव सरकारच्याही विचाराधिन असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्राने दिली.
इस्लाम हा बांगलादेशचा औपचारिक राजधर्म असल्याचे १९८८ मध्ये जाहीर करण्यात आले होते. पण, वाढत्या हल्ल्यांमुळे इस्लामला असलेला राजधर्माचा दर्जा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका दाखल झाल्यानंतर देशातील अनेक अल्पसंख्यक नेत्यांनी त्यास पाठिंबा दर्शविला आहे. असे असले, तरी सुमारे ९० टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात या मोहिमेला किती पाठिंबा मिळतो, याकडे अनेक देशांचे लक्ष लागले आहे. बांगलादेशात ८ टक्के लोकसंख्या हिंदू असून, उर्वरित दोन टक्क्यांमध्ये ख्रिश्‍चन आणि इतर अल्पसंख्यकांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27074

Posted by on Mar 6 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (752 of 2458 articles)


=प्रकल्पांच्या कामांना गती येणार : गिरीश महाजन= नवी दिल्ली, [६ मार्च] - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतर्ंगत राज्यातील ...

×