Home » गुजरात, ठळक बातम्या, राज्य » बान की मून करणार सौर प्रकल्पाचे उद्‌घाटन

बान की मून करणार सौर प्रकल्पाचे उद्‌घाटन

UN SECRETARY GENERAL MEETS WITH SPANISH PRESIDENTबडोदा, [१० जानेवरी] – नर्मदा नदीच्या कालव्यावर उभारण्यात आलेल्या गुजरातच्या पहिल्या १० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांच्या हस्ते उद्या, रविवारी करण्यात येणार आहे. त्यानंतर ते ‘व्हायब्रंट गुजरात’मध्येही सहभागी होणार आहेत.
गुजरात सरकारने महत्त्वाकांक्षी सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेड’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेने १० महिन्यांपूर्वीच सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम हाती घेतले होते, अशी माहिती गुजरातचे ऊर्जा मंत्री सौरभ पटेल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी १०९.९१ कोटी रुपये खर्च करून, पूर्ण झालेला हा प्रकल्प म्हणजे गुजरातने या क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारात मानाचा तुराच आहे. हा प्रकल्प हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीने पूर्णत्वास नेला आहे. यापूर्वी एमईआयएलने महाराष्ट्रात ५० मेगावॅट, तर आंध्रप्रदेशात २० मेगावॅट प्रकल्पाची निर्मिती केली आहे. हा गुजरात राज्यातील पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प आहे. २५ वर्षेपर्यंत या प्रकल्पाच्या देखभालीचे काम एमईआयएलच करणार आहे. ३३००० ते ३६००० सौर पॅनेलचा या प्रकल्पासाठी उपयोग करण्यात आला. ताशी १५० किलोमीटर वेग असलेल्या हवेचा सामना करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. पहिल्या वर्षी १.६२ कोटी विजेचे युनिट उत्पादन या प्रकल्पातून होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19544

Posted by on Jan 11 2015. Filed under गुजरात, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गुजरात, ठळक बातम्या, राज्य (2261 of 2452 articles)


=सरन्यायाधीशांचेही मत= नवी दिल्ली, [१० जानेवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय चांगले नेते तर आहेतच, शिवाय त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टीही ...

×