Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » बाबासाहेब जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञही होते

बाबासाहेब जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञही होते

=आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून विशेष आभार=
FADNAVIS_DEVENDRA1लंडन, [१५ नोव्हेंबर] – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्तम अशा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची महान कर्तबगारी बजावली आहे. मात्र, त्यांची महानता केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नसून, बाबासाहेब एक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञही होते. ब्रिटीश पौंड आणि डॉलरशी स्पर्धा करू शकण्यासाठी भारतीय रुपयाच्या परिवर्तनशीलतेच्या धोरणासारख्या उपाययोजना त्यांनी सुचविल्या, असे गौरवोद्‌गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लंडन येथे काढले.
फेडरेशन ऑफ आंबेडकर आणि बुद्धीस्ट ऑर्गनायझेशन्स या संस्थेतर्फे लंडनमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यशाळेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, संस्थेचे अध्यक्ष संतोष दास यांच्यासह ब्रिटनमध्ये कार्यरत असलेले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वोत्कृष्ठ राज्यघटना आहे. केवळ मुठभरांच्या हिताचा विचार न करता, देशातील प्रत्येकाला तिच्या माध्यमातून सरकारने स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची हमी दिली आहे. भारताच्या आजच्या प्रगतीचे कारण आपली राज्यघटनाच आहे. विविध विषयांवरील त्यांचा व्यासंग विस्मयचकित करणारा आहे. एकच व्यक्ती वेगवेगळ्या विषयांवर किती सखोलतेने विचार करू शकते, याचे बाबासाहेब हे एक अभिमानास्पद उदाहरण आहे. अर्थतज्ज्ञ बाबासाहेब हा एक दुर्लक्षित पैलू असून, तो जगासमोर ठळकपणे मांडण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूचे स्मारकात रुपांतर करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याबद्दल संस्थेतर्फे यावेळी मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले.
मित्तल यांना निमंत्रण
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भेट घेतली. गडचिरोलीसारख्या भागात लोहखनिजाचे मोठ्या प्रमाणावर साठे असून, त्यावर आधारित उद्योगाच्या उभारणीसाठी राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांना केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25474

Posted by on Nov 16 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1240 of 2458 articles)


वॉशिंग्टन, [१५ नोव्हेंबर] - पॅरिस, बैरूत आणि अन्य काही देशांमध्ये अलीकडील काळात इसिस या जहाल आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाने केलेले भीषण ...

×