Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » बाल कामगार विधेयक मोदी सरकारपुढील आव्हान

बाल कामगार विधेयक मोदी सरकारपुढील आव्हान

=कैलास सत्यार्थी यांचे मत=
Kailash Satyarthi1लंडन, [८ फेब्रुवारी] – बाल कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी बाल कामगार विधेयक संसदेत पारित करण्याचे सर्वात मोठे आव्हान नरेंद्र मोदी सरकारला पेलावे लागणार आहे, असे मत बाल हक्कांसाठी संघर्ष करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केले आहे.
नवीन सरकार या समस्येला कितपत राजकीय प्राधान्य देते, यावर या विधेयकाचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे सत्यार्थी यांनी सांगितले. १४ वर्षांखालील मुलांना कामावर नेमण्यास व १८ वर्षांखालील कामगारांना आरोग्यास अपायकारक वातावरणात काम करवून घेण्यास पूर्णत: बंदी असलेल्या कायद्यात आवश्यक बदल करणार्‍या विधेयकावर सत्यार्थी यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले.
सामाजिक प्रश्‍नांबाबत नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. स्वच्छ भारत व बेटी बचाव यासारख्या प्रमुख सामाजिक प्रश्‍नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले असून, ही बाब सरकारची सकारात्मकता दर्शवते आणि सरकारचा राजकीय दृष्टिकोनही यातून दिसून येतो. मी याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधला असून, प्रगत राष्ट्र होण्यासाठी स्वच्छ भारताबरोबरच बालकल्याणाचे कार्यक्रमही प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे आणि बालकांशी मैत्रीपूर्ण संबंध असणे गरजेचे असल्याचे सत्यार्थी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची मान उंचावण्यासाठी कणखर नेतृत्व व परिणामकारक निर्णय घेणे गरजेचे असून, बालशोषण थांबवणेही तितकेच आवश्यक ठरणार आहे. याबाबत भारताला अजून बरेच काही करणे बाकी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20421

Posted by on Feb 9 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (2097 of 2458 articles)


मुंबई, [६ फेब्रुवारी] - गायिका श्रेया घोषाल तिच्या बालपणीचा मित्र शिलादित्यसोबत विवाहबंधनात अडकली आहे. मुख्य म्हणजे हा विवाहसोहळा अत्यंत गुप्त ...

×