बाळगंगा धरण घोटाळा: अजित पवारांवर गुन्हा
Friday, September 25th, 2015मुंबई, [२४ सप्टेंबर] – रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरणाच्या कामातील गैरव्यवहाराबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा नोंदविला आहे.
पवार व इतरांविरुद्ध ९२.६३ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे. या सिंचन घोटाळ्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याआधीच गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. त्याच धर्तीवर ईडीने गुन्हा (ईसीआयआर) नोंदविला असून, आम्ही या गैरव्यवहारातील ‘अवैध सावकारीच्या पैलूचा तपास करणार आहोत, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
तत्पूर्वी, एसीबीने पाठवलेल्या समन्सनुसार चौकशीसाठी वेगवेगळ्या कारणांवरून अनुपस्थित राहणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आता ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत.
Short URL: https://vrittabharati.in/?p=24043

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!