Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारच्या न्यायालय परिसरात आत्मघाती हल्ला

बिहारच्या न्यायालय परिसरात आत्मघाती हल्ला

=तीन ठार, १६ जखमी, दोन कैदी फरार=
Bomb-Blast-Ara-Court-Biharआरा, [२३ जानेवारी] – बिहारच्या आरा येथील दिवाणी न्यायालयाच्या संकुलात झालेल्या मानवी बॉम्ब स्फोटात एका पोलिसासह तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य १६ जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर दोन कैदी पळाले असल्याची माहिती आहे.
या न्यायालयात काही कुख्यात कैद्यांना हजर करण्यासाठी आणले असता, मानवी बॉम्ब बनलेल्या एका महिलेने सकाळी साडेअकराच्या सुमारास हा स्फोट घडवून आणला. तिने आपल्या बॅगमध्ये शक्तिशाली स्फोटके पेरून ठेवली होती. यात तिच्याही चिंधड्या उडाल्या, अशी माहिती विभागीय पोलिस अधिकारी अमरेंद्र कुमार आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली.
परिसरातून स्फोटकांचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर स्फोट नेमका कोणत्या स्वरूपाचा होता आणि कोणत्या रसायनांचा वापर करण्यात आला, हे स्पष्ट होणार आहे. घटनास्थळी एक मोबाईल फोनही आढळून आला असून, तोदेखील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांना घेऊन पोलिस व्हॅन न्यायालयात आली असता, एक महिलाही तिथे आली. त्यानंतर लगेच स्फोट झाला. ही महिला कैद्यांना भेटण्यासाठीच आली असावी. या कैद्यांना ठार मारण्याचा किंवा त्यांना सोडविण्याचा तिचा उद्देश असावा. तिने आपल्या बॅगमध्येच स्फोटके ठेवली होती आणि रिमोटच्या मदतीने त्यांचा स्फोट केला. तिची ओळख अद्याप पटलेली नाही.
या स्फोटात संशयित महिलेसोबतच एक पोेलिस आणि एक नागरिक ठार झाला असून, अन्य १६ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या स्फोटाबाबतची माहिती बिहार सरकारला मागितली आहे. बिहार सरकारने हा अतिरेकी हल्ला नसावा, अशी शक्यता व्यक्त केली असली तरी तपास अहवालानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सरकारचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20018

Posted by on Jan 24 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (2180 of 2452 articles)


ओबामा यांचे प्रतिपादन दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करा; पाकला ठणकावले २६/११ च्या दोषींना शिक्षा व्हायलाच हवी नवी दिल्ली, [२३ ...

×