Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारमध्ये आजपासून दारूबंदी लागू

बिहारमध्ये आजपासून दारूबंदी लागू

nitish_kumarपाटणा, [५ एप्रिल] – संपूर्ण बिहार राज्यात आजपासून दारूबंदी लागू झाली आहे. त्यामुळे राज्यात फक्त देशीच नाही तर विदेशी दारूही मिळणार नसून बिहार राज्य आजपासून संपूर्णपणे ‘ड्राय डे’ झाले आहे. संपूर्ण दारूबंदी करणारे बिहार हे गुजरात, केरळ आणि नागालॅण्डनंतर देशातील चौथे राज्य ठरले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी एप्रिल महिन्यापासून राज्यात दारूबंदीची घोषणा केली होती. तसेच राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्याचे आश्‍वासनही दिले होते. त्यानुसार १ एप्रिलपासून राज्यात देशी आणि विदेशी दारूवर बंदी लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज जाहीर केले की, यापुढे हॉटेल आणि बारमध्ये मद्याची विक्री करता येणार नाही. तसेच कुणालाही मद्यविक्रीसाठी परवानाही दिला जाणार नाही. मात्र, फक्त लष्कराच्या उपहारगृहात मद्यविक्री सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27710

Posted by on Apr 5 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (526 of 2452 articles)


नवी दिल्ली, [४ एप्रिल] - ‘भारत माता की जय’ म्हणण्याच्या मुद्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळात आता योगगुरू रामदेवबाबा यांनीही ...

×