Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारमध्ये तिसर्‍या टप्प्याचे मतदान सुरू

बिहारमध्ये तिसर्‍या टप्प्याचे मतदान सुरू

bihar-election4पाटना, [२८ ऑक्टोबर] – पाच टप्प्यांमध्ये होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या आणि महत्वाच्या टप्प्यासाठी आज बुधवारी मतदान होत आहे. तिसर्‍या टप्प्यात एकूण ५० जागांसाठी हे मतदान होत असून ८०८ उमेदवारांचे राजकीय भविष्य आज ठरणार आहे. यात ७१ महिला आहेत.
पाटना, वैशाली,सारन, नालंदा, बक्सर आणि भोजपूर या सहा जिल्हयांमध्ये मतदान सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. तिसर्‍या टप्प्यात एकूण १ कोटी ४५ लाख ९३ हजार ९८० नागरिक मतदान करणार आहे. मतदान करण्यासाठी एकूण १४,१७० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी ६,७४७ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे दहा मतदारसंघात दुपारी चार तर उर्वरित मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. बर्‍याच मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वीच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची दोन मुले तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव हे महुआ आणि राघोपूर मतदारसंघातून निवडणुकीत उभे आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25370

Posted by on Oct 28 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1265 of 2452 articles)


=डोबाल यांचा ‘मास्टर प्लान’= नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] - अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ...

×