Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारमध्ये महाआघाडीला झटका

बिहारमध्ये महाआघाडीला झटका

=जदयु मंत्र्याचा राजीनामा, भाजपात प्रवेश=
bihar election1पाटणा, [३ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी एकवटलेल्या महाआघाडीला ऐन विधानसभा निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला. नितीशकुमार सरकारमधील पशुसंवर्धन आणि मत्सोद्योग मंत्री वैद्यनाथ साहनी यांनी मंत्रिपदासोबतच जदयुचाही राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला.
समस्तीपूर जिल्ह्यातील मोरवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले साहनी यांना जदयुने यावेळी निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने ते निराश झाले. या मतदारसंघात १२ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कार्यालयाला आपला राजीनामा पाठविल्यानंतर तो स्वीकृत होण्याची प्रतीक्षाही न करता त्यांनी भाजपाच्या पाटण्यातील मुख्यालयात पक्षप्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. निशाद समाजाचे असलेले वैद्यनाथ साहनी यांचा राजीनामा जदयु-राजद-कॉंगे्रसचा समावेश असलेल्या महाआघाडीकरिता मोठा धक्काच मानला जात आहे. मोरवा मतदारसंघात निशाद समाजाची मते जास्त असून, साहनी यांचे या मतदारसंघात चांगलेच वजन आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24139

Posted by on Oct 4 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1383 of 2452 articles)


नवी दिल्ली, [३० सप्टेंबर] - भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पुतणे ए.पी.जे.सलीम शेख सोमवारी भारतीय जनता पार्टीत ...

×