Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारमध्ये रालोआला स्पष्ट बहुमत

बिहारमध्ये रालोआला स्पष्ट बहुमत

=‘झी मीडिया’चा सर्वेक्षणातून दावा=
BJP-FLAG-RALLY-IN-UP-1नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] – बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. सभा आणि रॅलींच्या माध्यमातून वातावरण पुरते तापले आहे. जाती आणि धर्मावरून आता व्यक्तिगत आयुष्यावर चिखलफेक सुरू असतानाच, एका वृत्तवाहिनीने केलेल्या जनमत चाचणीत बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्तेवर येणार असल्याचे दिसून आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट बिहारमध्ये रोखून धरण्यासाठी जदयु, राजद आणि कॉंगे्रस महाआघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. महाआघाडी आणि रालोआतील ही लढत कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी ‘झी मीडिया’ने जनतेच्या मनाचा अंदाज घेतला असता, बिहारवासीयांना केवळ नरेंद्र मोदी यांच्या विकास धोरणांवरच विश्‍वास असल्याचे दिसून आले. २४३ सदस्यीय विधानसभेत रालोआला १४७ जागा मिळतील आणि स्पष्ट बहुमतासह सत्तेवर येईल, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
५३.८ टक्के लोकांनी आपला कौल रालोआच्या पदरात टाकला आहे. तर, ४० टक्के लोकांना पुन्हा एकदा नितीशकुमारच मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. विशेष म्हणजे, नक्षलप्रभावित भागातील ५४.६ टक्के लोकांनीही विकासाला प्राधान्य देत आपले मत रालोआला देण्याचा निर्धार केला आहे. तर, ३९.७ टक्के लोकांनी नितीशकुमारांना पसंती दिली आहे.
बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडणार्‍या यादव आणि मुस्लिमांनी मात्र भाजपापेक्षा नितीश-लालू-कॉंगे्रसच्या महाआघाडीला आपला कौल दिला आहे. ४३.७ टक्के लोकांनी रालोआला आणि ५०.२ टक्के लोकांनी महाआघाडीला पसंती दिली आहे. त्याचप्रमाणे, ५७.४ टक्के हिंदूंनी रालोआवर आणि ३६.६ टक्के हिंदूंनी महाआघाडीवर विश्‍वास व्यक्त केला आहे. मुस्लिम समाजातील ५७.९ टक्के लोकांनी महाआघाडीला, तर ३५.९ टक्के लोकांनी रालोआला कौल दिला असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25011

Posted by on Oct 7 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1367 of 2452 articles)


प्रकल्प सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता पुनरुज्जीवनासाठी राज्य शासन प्रयत्नशील ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती मुंबई, [६ ऑक्टोबर] - दाभोळ ...

×