Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारात जंगलराज जोरात

बिहारात जंगलराज जोरात

=पोलिस अधिकार्‍याला गोळ्या घातल्या=
bihar-mapवैशाली, [९ जानेवारी] – बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या सत्तेतील वापसीसोबतच जंगलराजही प्रचंड बोकाळला आहे. अभियंते आणि व्यावसायिकांच्या हत्यासत्राचे तीव्र पडसाद अजूनही कायम असताना, वैशाली जिल्ह्यात एका पोलिस अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
हाजीपूर सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनुआ गावात आज शनिवारी सकाळी पोलिस उपनिरीक्षकाचा गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह काही लोकांना आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच, पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अशोक यादव असे या पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे.
अशोक यादव वैशाली पोलिस ठाण्यातच तैनात होते आणि गेल्या तीन दिवसांपासून ते रजेवर होते. मारेकर्‍यांनी त्यांच्याच सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून त्यांची हत्या केली आणि नंतर त्यांची रिव्हॉल्वर लुटून नेली, असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.
पासवान यांची टीका
राज्यात जदयु-राजद-कॉंग्रेस सरकार स्थापन झाल्यापासून हत्या आणि दरोड्यांच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. लालूंचे राज्यात पुन्हा एकदा जंगलराज सुरू झाले आहे. संख्याबळ कमी असल्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार हतबल आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26452

Posted by on Jan 10 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (930 of 2452 articles)


सेऊल, [६ जानेवारी] - उत्तर कोरियातील अणुबॉम्ब चाचणी केंद्राजवळ आज बुधवारी विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वीपणे करण्यात आली. मात्र ...

×